लोक पऱ्या आणि देवदूतांबद्दलही बोलतात त्याबाबत तुम्हाला काय वाटतं?

तुम्ही एकदा स्वर्गाचं अस्तित्व मानलं म्हणजे त्याबरोबर पऱ्या आणि देवदूत आलेच. परंतु मुळात जर स्वर्गच नसेल तर तुमचा आनंद वाढवायला पऱ्याही नसणार आणि आशिर्वाद द्यायाला देवदूतही नसणार. १९ व्या शतकामध्ये या पऱ्या आणि देवदूतांबाबत बरीच गरमागरम चर्चा होत असे. एवढेच काय, शेरलॉक होम्सचे लेखक आर्थर कोनंडायल सुद्धा त्यांच्या बागेतल्या एका फोटोमध्ये दिसणाऱ्या पऱ्या खऱ्या आहेत असे समजत होते. तो फोटो कसा नकली आहे हे त्यांचा जादुगार मित्र हौदिनी याने सिद्ध करून दाखविल्यावर त्यांचा गैरसमज दूर झाला. तो फोटो दोन मुलींनी काही क्लुप्त्या वापरून काढलेला होता.