प्लँचेटबाबत आणि भुतांना आवाहन करण्याबाबत लोक बोलत असतात; तुम्हाला त्याबाबत काय वाटतं?

माझी आजी वारली त्या प्रसंगाची मला तीव्र आठवण येत असते. तिने आम्हाला सोडून जावू नाही असं आम्हाला फार वाटायचं. त्यामुळे भुताची कल्पना मला आवडायची; त्यामुळे मी आजीशी बोलू शकेन असं वाटायचं. आपल्याला भूतकाळाशी जोडणारं साधन म्हणजे ही भुतं. ती असावीत अशी आपल्याला जबर एच्छा असते.
आपल्या ह्या प्रबळ इच्छेचा उपयोग हे ढोंगी स्वयंघोषित चॅनलर करीत असतात; आपल्याला आपल्या प्रिय मृत व्यक्तीशी संपर्क करून देण्याचे आश्वासन देतात. आपल्याला मृत व्यक्तींशी मरणोत्तर संपर्क साधण्याचा जन्मसिद्ध हक्क मिळालेला आहे असे ही मंडळी मानतात किंवा भासवतात. यांच्या कारवायांचा विवेकवाद्यांनी तपास केल्यावर असं लक्षात आलं की ह्या मंडळींचं भोळ्या भाबड्या लोकांच्या दुःखाचं आणि भावनांचं भांडवल करून त्यांना लुबाडण्याचं मोठं षडयंत्र आहे.