आपल्याला ज्यांच्याबद्दल काही माहिती नाही अशा कित्येक गोष्टी या पृथ्वीतलावर आहेत तशीच भुतंही असू शकणार नाहीत का?

जगामध्ये काही घटना अशा असू शकतात की ज्यांचे स्पष्टीकरण अजून करता येत नाही. पण भुतांवरचा विश्वास ही तशी घटना नाही. भुतांचे अस्तित्व हा मानसिक विकार आहे आणि त्याचा आणखी अभ्यास व्हायला हवा असे शास्त्रज्ञ मानतात. मानसशास्त्र, मानवाचं वर्तन, मज्जाशास्त्र, मेंदूचं कार्य इत्यादींमधील अद्यावत संशोधनातून असं दिसून आलं आहे की भूतं ही माणसाच्या मनामध्ये कल्पनारूपाने असतात. बाह्य जगामध्ये त्यांना अस्तित्व नाही.