पूर्वजन्मामध्ये असं प्रतिगमन करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का?

पूर्वजन्म प्रतिगमन ही एक भ्रामक उपचारपद्धती आहे. ती आपण टाकूनच दिली पाहिजे. अमेरिकेमध्ये तर या उपचारपद्धतीने अनेक वाद उत्पन्न झाले; आपल्या मुलांच्या पूर्वजन्माबाबत मिळालेल्या माहितीमुळे त्यांच्याशी वाईट वर्तणूक करणाऱ्या बऱ्याच पालकांना यातना सहन कराव्या लागल्या, कारावासही भोगावा लागला. आपल्या छद्मी बोलण्यातून ते लोकांवर मोहिनी घालतात. या लोकांच्या बाबतीत आजार (अर्थात इतरांचा, त्यांचा स्वतःचा नव्हे) म्हणजे शिकण्याची संधी, अशक्य गोष्ट म्हणजे आव्हान, कल्पनाविलास हा उद्योग, श्रद्धा म्हणजे तिकिट आणि मृत्यू म्हणजे अवस्थान्तर असतं. यांच्यापासून सावध रहा.