नक्षत्र आणि राशींची दुनिया

ज्योतिषाचा सर्व खेळ नक्षत्र आणि राशीवर चालतो. सर्व सामान्यांना नक्षत्र आणि रास म्हणजे काय याची बिलकूल कल्पना नसल्यामुळे ज्योतिषांच चांगलच फावतं. रात्रीच्यावेळी आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांचे भारतीयांनी सत्तावीस समूह नक्षत्राच्या रूपाने केले. तर ग्रीकांनी बारा समूह राशींच्या रूपाने निर्माण केले. आकाशात रास आणि नक्षत्र उघड्या डोळ्यांनी दिसतात. सत्तावीस नक्षत्र बारा राशीत विभागली जातात. त्यामुळे एका राशीला सव्वादोन नक्षत्रे येतात. आकाशातील भारतीयांचे सत्तावीस स्टॉप तर ग्रीकांचे बारा स्टॉप. या स्टॉपच्या पार्श्वभूमीवर सूर्य, चंद्र आणि ग्रह आपली जागा बदलत असतात. रास ही संकल्पना ग्रीकांची आहे, मग आपले संस्कृतीरक्षक ज्योतिषी पाश्चात्यांच्या संस्कृतीतील संकल्पनांचा वापर कसा करतात? हा मला पडलेला प्रश्न आहे. आपणाला पडतो का पाहा. खालील कोष्टकामध्ये नक्षत्र आणि राशी अनुक्रमांकानुसार दिलेल्या आहेत.

राशीचा क्रमांक राशीचे नाव नक्षत्राचा क्रमांक नक्षत्राचे नाव  









१०
११
१२
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनु
मकर
कुंभ
मीन









१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहीणी
मृगशिर्ष
आर्द्रा
पुनर्वसू
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विषाखा
अनुराधा
जेष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र बारा राशींच्या पार्श्वभूमीवर

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सत्तावीस नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर

         


सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे रास आणि नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर सोबतच्या चित्रांमध्ये दिसत आहेत. एका राशीमध्ये सव्वादोन नक्षत्रं येत असली, तरी रास आणि नक्षत्रांची सांगड आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या राशींशी जुळत नाही. त्यांच्यामध्ये प्रचंड तफावत जाणवते. याबद्दल मात्र ज्योतिषी अवाक्षरही बोलत नाहीत. बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रांचा अभ्यास ज्योतिषांनी फक्त पंचांगाद्वारे केलेला आहे, प्रत्यक्षात आकाशनिरीक्षण करून नाही, हे त्याचं गमक आहे.
आकाशात दिसणाऱ्या वृश्चिक राशीमध्ये प्रत्यक्षात अनुराधा, ज्येष्ठा व मूळ ही तीन नक्षत्रे येतात. परंतु पंचांगवाल्यांना आपली सत्तावीस नक्षत्रं बारा राशीमध्ये बसावायची असल्यामुळे विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा यांनाच घेता येतं. वास्तव झाकून ठेवण्याचाच हा प्रकार. दिसतं एक, समजतात दुसरंच. हे काय सांगणार भविष्य, डोंबलाच!
बारा राशींपैकी आपणाला समजण्यासाठी फक्त दोन राशींची ओळख करून घेऊ, सिंह आणि वृश्चिक रास. सिंह राशीमध्ये मघा, पूर्वाफाल्गुनी आणि उत्तराफाल्गुनी ही तीन नक्षत्रे येतात. वृश्चिक राशीमध्ये अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ ही तीन नक्षत्रे येतात. सिंह राशीतील तारे ९००,०००,०००,०००,००० किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर मोजताना दमछाक होते, म्हणून या प्रचंड अंतराला नव्वद प्रकाशवर्ष म्हणतात. याचा अर्थ असा होतो की, आज रात्री आकाशात आपण सिंह रास पाहिली, तर ती आजची नसते, नव्वद वर्षापूर्वीची असते. नव्वद वर्षापूर्वीची रास व्यक्तीचं भविष्य घडवणार? की आपण निर्माण केलेली परिस्थिती? वृश्चिक राशीतील तारे आहेत ५,२००,०००,०००,०००,००० किलोमीटर अंतरावर, म्हणजे पाचशे वीस प्रकाशवर्ष दूर. आज पाहिलेली वृश्चिक रास पाचशे वीस वर्षापूर्वीची असणार. या प्रचंड अंतरावरील राशींना आणि नक्षत्रांना आपल्या जन्माशी जोडायला जाणारे एकविसाव्या शतकातील तथाकथीत सुशिक्षित म्हणवणाऱ्या आपण सर्वांनीच वस्तुस्थिती नीट समजावून घेतली पाहिजे. चित्ररूपाने सिंह आणि वृश्चिक रास सोबत दाखवली आहे. आकाशामध्ये फक्त तारे दिसतात. आपण त्या ताऱ्यांना कल्पनेनं जोडल्यानंतर नक्षत्र किंवा रास या आकृत्या तयार होतात.

मघा, पूर्वा फाल्गुनी, आणि उत्तरा फाल्गुनी मिळून सिंह रास तयार होते


अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्र मिळून वृश्चिक रास तयार होते


अधिक माहितीसाठी खालील पुस्तके वाचा. संपर्क (९८६०४३८२०८)
१. सफर विश्वाची, डॉ. नितीन शिंदे, नाग नालंदा प्रकाशन, इस्लामपूर
२. पत्रिका जुळवताना, डॉ. नितीन शिंदे, नाग नालंदा प्रकाशन, इस्लामपूर