डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचं दर्शन घडवितं.
श्रद्धा तपासून पाहण्याच भान डॉ. दाभोलकर या पुस्तकातून देतात. ‘विज्ञानाच्या
विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे’ असं ते म्हणतात.
समाजात वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या रुढी-परंपरांचा पगडा आहे,
त्या रुढी हद्दपार करण्यासाठी ‘अंनिस’ ने केलेल्या आणि करीत असलेल्या लढायांची
समग्र माहिती या पुस्तकातून मिळते. प्रवाहाविरुद्ध पोहत असताना होणाऱ्या त्रासाचं,
येणाऱ्या अडचणीचं अस्वस्थ दर्शन त्यांतून घडतं. समाजसुधारकांचे विचार प्रत्यक्षात यावेत, हाच या चळवळीमागचा हेतू असल्याचं ते पुस्तकातून सिद्ध करतात. ‘हि देशातील दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे’
हि भूमिका हि ते मांडतात..
