विश्वस्त – श्री. प्रतापराव पवार

श्री. प्रतापराव पवार यांनी राजस्थानातील पिलानी येथील ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सायन्स’ येथून इंजिनिअरिंगमधील पदवी संपादन केली आहे. ते ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी १९६८ मध्ये ‘अजय मेटाकेम लिमिटेड’ची स्थापना केली आणि हा व्यवसाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवला.
सध्या भूषवित असलेली पदे :

 • मीडिया रिसर्च युजर्स कौन्सिल इंडियाचे अध्यक्ष व कार्यकारी बोर्डाचे सदस्य.
 • ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशनच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य.
 • महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश विभागाच्या जाहिरात समितीचे अध्यक्ष व नवी दिल्लीतील द इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या इतर समित्यांचे सदस्य.
 • पॅरिसमधील वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्सचे (वॅन इन्फ्रा) उपाध्यक्ष होते व कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.
 • एमएसबीटीईच्या संचालक समितीचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य.
 • महाराष्ट्र सरकारने त्यांना २००४ मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पहिल्या संचालक बोर्डाचे सदस्य म्हणून नामांकित केले. सरकारने २०२० मध्ये त्यांची संचालक बोर्डाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली.
 • ते पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील (सीओईपी) भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन आंत्रप्रेन्युअरशीप व लिडरशीप विभागाचे
  संस्थापक संचालक व अध्यक्ष आहेत.
 • ते पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड, फोर्स मोटर्स लिमिटेड आणि ब्रिटनमधील भारत फोर्ज इंटरनॅशनल लिमिटेडचे संचालक आहेत. त्याचबरोबर किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड आणि फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे मागील अनेक वर्षांपासून संचालक होते.
  माजी अध्यक्ष :
 • द मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अ‍ॅग्रीकल्चर, पुणे
 • द इंडियन न्यूजपेपर सोसायटी, नवी दिल्ली
  मानाचे पुरस्कार :
  श्री. पवार यांना व्यापार, उद्योग, पत्रकारिता व सामाजिक कार्यातील असामान्य कर्तृत्वाबद्दल अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
 • भारत सरकारतर्फे पद्मश्री
 • अजय मेटाकेमसाठी १९७८ मध्ये पारखे पुरस्काराचे मानकरी.
 • पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी.
 • पुण्यातील टिळक महाराष्ट्र डीम्ड युनिव्हर्सिटीतर्फे (टि.म.वि.) सन्माननीय डी.लिट. पदवी.
 • फ१⁄२र्युसन कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांची संघटना द फ१⁄२र्युसियन्सतर्फे ‘फ१⁄२र्युसन गौरव पुरस्कार’.
 • बीड पत्रकार संघातर्फे दिला जाणारा सातवा कै. स. मा. गर्गे पुरस्कार.
 • पुणे विद्यापीठातर्फे दिला जाणारा जीवन साधना गौरव पुरस्कार.
 • इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंगचा सन्माननीय सदस्य पुरस्कार.
 • शंकरराव कानिटकर गौरव समिती पुरस्कार.
  सामाजिक कार्ये :
  श्री. पवार पुण्यातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे विश्वस्त असून, या संस्था आणि ट्रस्टच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
  विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे (स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन)
  ही संस्था अभ्यासात हुशार असलेल्या मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुला-मुलींना मदत करते. या मुलांची अत्यंत माफक दरात राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था करते. त्याचबरोबर शैक्षणिक मदत व मार्गदर्शनही केले जाते. पुण्यातील तीन वसतिगृहांच्या माध्यमातून ८०० विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे. श्री. पवार संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे १९८१ पासून अध्यक्ष असून, १९७४ पासून विश्वस्त आहेत.
  पूना स्कूल अ‍ॅण्ड होम फॉर ब्लाइंड
  दि पूना स्कूल अ‍ॅण्ड होम फॉर द ब्लाइंड (पी.एस.एच.बी) या संस्थेची स्थापना १९३४ मध्ये झाली असून, ती पुण्यातील अग्रगण्य बिगर-सरकारी संस्था आहे. ती अंधांच्या कल्याणाचे काम करते. श्री. पवार यांनी १९६८ ते २००८ या काळात या संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे.
  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
  श्री. पवार या संस्थेचे १९९१ पासून संस्थापक विश्वस्त व अध्यक्ष आहेत. ही संस्था देशातील अमानवी प्रथा व अंधश्रद्धांविरोधात लढा देण्यासाठी समर्पित आहे. संस्थेचे उद्दिष्ट लोकांची सामाजिक मानसिकता बदलणे व त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन बिंबविणे, हा आहे.
  किर्लोस्कर फाउंडेशन
  किर्लोस्कर कुटुंबीयांनी या ट्रस्टची स्थापना कोणतीही उद्योजक पार्श्वभूमी नसलेल्यांना उद्योजक बनण्यात मदत करण्यासाठी केली. ट्रस्टद्वारे शेकडो जणांना त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदत व तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन करण्यात आले आहे. श्री. पवार या संस्थेचे ४० वर्षांहून अधिक काळ विश्वस्त होते.
  बालग्राम – एसओएस चिल्ड्रेन व्हिलेज, येरवडा
  (एसओएस इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने.)
  ही संस्था निराधार महिला व मुलांना घर व मदत पुरवते. अशा अनेक घरांपासून एक गाव बनते. बालग्रामचे बांधकाम १९७७ ते १९८१ या कालावधीत सुमारे दीड कोटी रुपये खर्चून झाले. महाराष्ट्रातील बालग्राम चळवळीच्या माध्यमातून अशा १६ गावांना आर्थिक मदत व साहाय्य देण्यात आले आहे. श्री. पवार या संस्थेचे संस्थापक विश्वस्त व खजिनदार होते. श्री. पवार यांची ऑक्टोबर २००५ मध्ये एसओएस चिल्डेन्स व्हिलेजेस ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे बालकल्याण संस्था अपंग मुलांसाठी सांस्कृतिक व मनोरंजनात्मक काम करणारे हे देशातील एकमेव केंद्र असून, ते पुण्यातील राजभवनाजवळ स्थित आहे. श्री. पवार या संस्थेचे १९७८ पासून संस्थापक विश्वस्त व सचिव आहेत.
  बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे
  शेती विकासात अग्रगण्य असलेल्या या पुरस्कारप्राप्त धर्मादाय संस्थेची स्थापना १९६७ मध्ये झाली आहे. संस्थेचे कार्य देशातील १३ जिल्ह्यांत पसरले आहे. ‘बाएफ’ला मदतीचा हात देण्यामध्ये राज्य व केंद्र सरकार, तसेच बिल गेट्स फाउंडेशन यांचा मुख्यत्वे समावेश होतो. श्री. पवार संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आहे. डॉ. नानासाहेब परुळेकर चॅरिटेबल ट्रस्ट श्री. पवार संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत.
  सकाळ इंडिया फाउंडेशन
  ही संस्था परदेशात उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत पुरवते. संस्था पात्र विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यक्रमांचे आयोजन करते. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला आहे. अनेक रिसर्च स्कॉलर्सनाही या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली आहे. श्री. पवार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत.
  सकाळ रिलीफ फंड
  श्री. पवार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत. सकाळ रिलीफ फंडाची स्थापना १९४२ मध्ये झाली असून, त्यामार्फत समाजाकडून मिळालेल्या छोट्या व मोठ्या देण१⁄२यांच्या माध्यमातून निधी उभा केला जातो. हा निधी पूर, दुष्काळ, युद्ध व इतर नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी बळी ठरलेल्यांना मदतीसाठी वापरला जातो. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांचे पाण्याच्या बाबतीत सबलीकरण करण्यासाठी जलयुक्त शिवार हा प्रकल्प राबविला जातो. हा प्रकल्प अनेक गावांत जोमाने कार्यरत आहे. ७५० गावांहून अधिक गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय भाग घेतला.
  एम्प्रेस गार्डन
  पुण्यातील एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन द अ‍ॅग्री-हॉर्टिकल्चरल ऑफ वेस्टन इंडियातर्फे केले जाते. श्री. पवार विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष आहेत.
  परिवार मंगल सोसायटी
  ही संस्था ‘सकाळ’च्या पाठिंब्याने पुणे जिल्ह्यात कुटुंब कल्याणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करते. श्री. पवार या सोसायटीचे अध्यक्ष होते.
  सकाळ निर्धार
  ही संस्था वाहतूक, प्रदूषण व लोकसंख्या नियंत्रणाच्या क्षेत्रांत काम करते. श्री. पवार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते.
 • श्री. पवार रिमांड होमचे (द डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अ‍ॅण्ड आफ्टर केअर असोसिएशन) माजी अध्यक्ष.
 • श्री. पवार महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनच्या जोशी हॉस्पिटलचे २०१४ पासून अध्यक्ष आहेत.
 • ते चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलचे विश्वस्त होते.
  महिला सेवा मंडळ, पुणे
  श्री. पवार या संस्थेचे गेली १० वर्षे अध्यक्ष होते. ही सामाजिक संस्था समाजातील गरजू महिलांसाठी १९४० पासून कार्यरत आहे. संस्था महिलांच्या पुनर्वसनासाठी मदत करते.
  अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती
  या संस्थेला गेल्या १५ वर्षांत कृषी क्षेत्रातील योगदानासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. श्री. पवार संस्थेचे विश्वस्त आहेत.